नेल्सन मंडेला यांची कन्या झिंदझी मंडेला यांचे निधन
माय अहमदनगर वेब टीम
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी लढ्याचे नेते नेल्सन मंडेला आणि विनी मंडेला यांची कन्या झिंदझी मंडेला यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. सरकारी टेलिव्हिजन साऊथ आफ्रिका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने सांगितले की, झिंदझी मंडेला यांचे सोमवारी सकाळी जोहान्सबर्गमधील एका रुग्णालयात निधन झाले.
त्या डेन्मार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राजदूत म्हणून कार्यरत होत्या. मंडेला १९८५ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखू लागल्या. आफ्रिन नॅशनल काँग्रेसने वर्णभेद विरोधी आपल्या चळवळीतून हिंसेला प्रोत्साहन देण्याचे बंद केल्यास नेल्सन मंडेला यांची सुटका करण्याची तयारी श्वेत वर्णीयांच्या सरकारने दर्शवली होती. पण, झिंदझी यांनी हा प्रस्ताव सभेत फेटाळला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाची तीव्रता अधिक होती. झिंदझी यांच्या भाषणाचे वार्तांकनाचे प्रसारण जगभरात दाखवण्यात आले होते.
Post a Comment