हार्दिक पटेलांकडे काँग्रेसने सोपविली मोठी जबाबदारी
माय अहमदनगर वेव्ह टीम
अहमदाबाद - गुजरात काँग्रेसमध्ये पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठा फेरबदल केला आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्याकडे गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
2019 च्या निवडणुकीआधी हार्दिक यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. राज्यात काँग्रेसचा प्रभाव वाढविण्यासाठी काँग्रेसने हार्दिक यांच्यावर राजकीय डाव लावला आहे.
Post a Comment