माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी पडले, अशी टिका करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशहितासाठी एनडीएत सामील व्हावं, असे म्हटले आहे.
ना.आठवले एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. सरकारवर पूर्णपणे ठाकरेंचे नियंत्रण आहे. सेनेसोबत जावून राष्ट्रवादीला काही फायदा झाला नाही. राष्ट्रवादीच दबावात आहे. शरद पवार यांच्या अनुभवाची देशाला गरज आहे. त्यांनी एनडीएत यावं, असे ते म्हणाले. त्यांनी सेनेला दिलेला पाठींबा काढून घेतला पाहिजे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
Post a Comment