नाशिक - विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारे एम.एस.सी. इन फार्मास्युटिकल मेडिसिन, हेल्थ केअर अॅडमिनीस्ट्रेशन व मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ (न्युट्रिशन) पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रासाठी सन 2020-21 करीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासक्रामांना प्रवेशाकरीता अर्ज करण्यासाठी दि. 22 जुलै 2020 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता करीयरच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणारे तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नाविण्यपुर्ण संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध निर्मिती क्षेत्रातील नाविण्यपुर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामंगावकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या मास्टर इन पब्लिक हेल्थ न्युट्रिशन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पोषणविषयक विशिष्ट कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि करण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे ज्ञान मिळत असल्याने हा अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, एमबीए इन हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉस्पिटल व्यवस्थापन, हॉस्पिटल सेवेचे सुयोग्य नियोजन, रुग्ण सेवेबाबत व्यवस्थापन आदी सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरीता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, एम.एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्रमांमधुन विद्यार्थ्यांना औषध निर्मिती संदर्भातील क्लिनिकल ट्रायल, मेडिकल राईटिंग, फॉर्माको व्हिजीलन्स रेग्युलेटरी अफेयर्स, मेडिको मार्केटिंग, क्लिनिकल रिसर्च आणि क्लिनिकल डाटा व्यवस्थापन आदी कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते याकरीता सध्याची परिस्थिती व भविष्यात करियरची मोठया प्रमाणात संधी उपलब्ध असल्याने हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशकरीता आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवी, पदविका परीक्षा उत्तीर्ण, बी.एस्सी नर्सिंग व अनुषंगिक अभ्यासक्रमाचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात तसेच एम.एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्रमाकरीता आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवीधर विद्यार्थी तसेचे बी.एस्सी, बी.फार्मसी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव पहाता विद्यापीठाने इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अंतीम मुदत दि. 22 जुलै 2020 पर्यंत दिली आहे. या अभ्यासक्रमाकरीता घेण्यात येणाÚया केंद्रिय सामायिक परीक्षेबाबतची माहिती लवकरच विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 0253 -2539108, 2539301 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे गुणवत्तापुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.
Post a Comment