या `५` गोष्टी दुर्लक्षित करूच नका !



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - तेलकट त्वचेची उत्तमप्रकारे काळजी घेण्यासाठी काही गोष्टी तुम्हांला तपासून पाहणं गरजेचे आहे.

तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार त्या कशाप्रकारे प्रभावी ठरतील हे अवलंबून असते. म्हणूनच डरमॅटॉलोजिस्टच्या सल्ल्यानुसार, तेलकट त्वचा असलेल्यांनी त्वचेची काळजी घेताना या गोष्टी अवश्य टाळाव्यात.

क्लिन्जिंग -
खूप वेळ काम किंवा प्रवास केल्यानंतर त्वचेवरील तेल,घाण काढणं गरजेचे आहे. पण क्लिन्जिंग करताना चेहरा जोरजोरात घासणं टाळा. यामुळे त्वचेवरील नॅचरल ऑईल कमी होऊन त्वचा शुष्क होऊ शकते.

मॉईश्चरायाझर -
त्वचा तेलकट आहे म्हणजे तुम्हांला मॉईश्चरायझरची गरज नाही असे नाही. त्वचा शुष्क असेल तर त्यामध्ये तेलाची निर्मिती होण्याचे प्रमाण वाढते.

खूप स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरणं -
स्किनकेअर प्रोडक्स अधिक प्रमाणात वापरणं देखील त्रासदायक ठरु शकते. सतत स्किनकेअर प्रोडक्ट बदलणं टाळा. दोन वेळापेक्षा अधिक क्लिन्जर वापरणं टाळा.

तेलकटपणा -
तुमच्या T-zone वर तेल आहे म्हणून संपूर्ण चेहर्‍यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी उपचार करू नका. तुमची त्वचा एकापेक्षा अधिक प्रकारची असू शकते. तुमच्या चेहर्‍यावरील कोणता भाग शुष्क आहे हे तपासून पहा.


तोंड खूप वेळा धुणे -
तेलकटपणा कमी करण्याचा एक पर्याय म्हणजे तो सतत धुत राहणे. असे काही जणांना वाटते पण आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा तोंड धुतल्याने चेहर्‍यावरील नॅचरल ऑईलदेखील कमी होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post