कोरोना संकट आणखी गंभीर होणार - जागतिक आरोग्य संघटना
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - करोना संसर्ग अद्यापही लोकांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, जगभरात करोना संकट अजून गंभीर होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी म्हटले आहे.
करोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे. जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी घेतली नाही तर तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल, अनेक देश चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत हे मला स्पष्ट करायचे आहे असेही ते म्हणाले. जिनिवा येथे करोनासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
सध्या जगभरात 1 कोटी 32 लाख लोकांना करोनाची लागण झालेली आहे. तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाऊन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल.
Post a Comment