शिक्षकांच्या ऑनलाईन कामाची माहिती ऑफलाईन मिळेना



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानूसार ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या व शहरी भागात महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास शिक्षक घेतात? घेत असल्यास तो ऑनलाईन की ऑफलाईन? त्यात विद्यार्थी-पालकांना अडचणी आल्या? किती शिक्षक या ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी झाले.

याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांकडून गेल्या सोमवारी मागवला होता. परंतु जिल्ह्यातील 14 पैकी अवघ्या तीन तालुक्यांनी हा अहवाल पाठविला आहे. यामुळे शिक्षकांच्या ऑनलाई कामाची ऑफलाईन झेडपीला मिळत नसल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारच्या सुचनेनूसार 31 जुलैपर्यंत एकही शाळा सुरू होणार नाही, असे शिक्षण विभागाचे आधीच जाहीर केले आहे. परंतु या काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू राहण्याच्या अनुषंगाने कार्यरत राहायचे असल्याच्या सूचना आहेत. त्यासाठी शिक्षकांनी शाळेत येवून ई-लर्निंग साहित्य निर्मिती करावी, ऑनलाईन अभ्यासक्रम, व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, गुगल मीट, झुमव्दारे मिटींग, दिक्षा अ‍ॅपव्दारे अध्यापन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना आहेत.

त्यानुसार गेल्या महिनाभरात जिलतील मराठी शाळा महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाचे काय केले, याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील घेत आहेत. ज्या ठिकाणी शक्य आहे, तेथे किती शिक्षक शाळेत गेले, त्यांनी विद्यार्थ्यांना किती दिवसांचा अभ्यासक्रम दिला, तो विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतला का?

ऑनलाईन शिक्षणात किती विद्यार्थी कार्यरत आहेत, किती शिक्षकांनी ऑनलाईन मिटिंग, तासिका, विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी घेतली, विद्यार्थी-पालक यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना अभ्यासक्रम दिला का? याचा शाळानिहाय, तालुकानिहाय शिक्षक आणि विद्यार्थी संख्येसह तपशील मागवला होता. याबाबत प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकाजयांना पत्र देवून हा आढावा दर सोमवारी सादर करावा, असे सीईओंनी म्हटले होते. परंतु मंगळवार उलटला तरी ही माहिती अद्याप शिक्षण विभागाकडे आलेली नव्हती.

करोनाच्या अतिरिक्त ड्युटीमुळे अनेक कर्मचारी सध्या कामावर नाहीत. या कर्मचार्‍यांना रात्री उशीरापर्यंत करोना ड्युटी असते. यामुळे दिवसा ते कामावर उशीरा येतात. यामुळे माहिती संकलनाास उशीर होत आहे. लवकरच ही माहिती संकलित करण्यात येणार आहे.
- रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post