एसटी कर्मचारी पगाराविनाच; जूनचाही पगार थकला
माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - गेल्या तीन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न बंद झाले आहे. आधीच ताेट्यात असलेल्या महामंडळाने सवलतीच्या रकमांमधून कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल व मे महिन्याचे पगार भागविले. मात्र आता एसटीकडे (ST) काेणतेही पेैसे शिल्लक नसून २० जुलै उलटूनही कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे कसे जगायचे असा यक्ष प्रश्न एक लाखांहून आधिक कर्मचाऱ्यांना पडला आहे.
अर्धा जुलै महिना लाेटला तरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अजूनही न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरत आहे. दरम्यान, शासनाने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी इंटकचेे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगाेटे यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व महामंडळाला उभारी मिळण्यासाठी सर्व पक्षाच्या एसटी संघटना व युनियनने एकी दाखविणे गरजेचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर यांनी केले आहे.
१५ जुलै उलटला तरी अद्याप जूनचा पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र शासनाने मे महिन्याचे ५० टक्के व जून महिन्याच्या संपूर्ण वेतनासाठी ५०० कोटी रुपये तत्काळ देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे यांनी केली आहे. महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत असून २,३०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Post a Comment