एमएमआरमध्ये दिवसात १११ कोरोना रुग्णांचा मृत्यू



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई / ठाणे - मुंबईत सोमवारी कोरोनाच्या 1228 नवीन रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 98 हजार 979 वर पोहोचला आहे. 62 जणांचा मृत्यू झाला असून 803 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 43 पुरुष व 19 महिला होत्या. 55 जणांना दीर्घकालीन आजार होते.

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी  1 हजार 707  नवे रुग्ण सापडले असून ते मुंबईपेक्षा अधिक आहेत. तब्बल 49  रुग्ण उपचार घेत असताना दगावले आहेत. ठाणे जिल्ह्यात  कोरोनाग्रस्तांची संख्या 64 हजार 105 वर पोहचली असून मृतांचा आकडा 1 हजार 827 वर पोहचला आहे. ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण भागात पुन्हा रुग्ण दगावल्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यात दुसर्‍या क्रमांकाची रुग्ण संख्या ही ठाणे जिल्ह्यात असून आता मुंबईपेक्षा अधिक रुग्ण हे दररोज ठाणे जिल्ह्यात सापडत आहेत. 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. हे लॉकडाऊन पुढे वाढविण्यास भाजप, व्यापारी तसेच शिवसेनेने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्याबाबत महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 14 लाख 84 हजार 630 नमुन्यांपैकी 2 लाख 92 हजार 589 नमुने पॉझिटिव्ह (19.7 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 24 हजार 602 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 284 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 8308 नवे रुग्ण

राज्यात शुक्रवारी  कोरोनाच्या 8308 नवीन रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 2 लाख 92 हजार 589 झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 20 हजार 480 रुग्णांवर  उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post