हळूहळू रुळावर येतेय आपली अर्थव्यवस्था; गुगल गतिशीलता अहवाल


माय अहमदनगर वेब टीम
कोरोना विषाणू संसर्गाने भारतासह संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प केली. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था आता हळूहळू रुळावर येत आहे. गुगलच्या कम्युनिटी मोबिलिटी अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, सहा प्रकारच्या लोकेशनवर लोकांच्या वर्दळीचे आकडे दिले आहेत. यामध्ये कोरोनाच्या आधीच्या पातळीपासून सध्याच्या पातळीची तुलना केली आहे. या ठिकाणांमध्ये रिटेल आणि मनोरंजन, सुपर मार्केट आणि औषधी, पार्क, सार्वजनिक वाहतूक, कामाचे ठिकाण आणि निवासी क्षेत्रांचा यात समावेश आहे. अहवालात ३ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीच्या सरासरीस बेसलाइन मानले आहे. म्हणजे, अहवालात हे जाणण्याचा प्रयत्न केला की, सध्या या सहा लोकेशनवर जशी स्थिती होती, त्या तुलनेत सध्या स्थिती कशी आहे.

अहवालानुसार, देशभरात रिटेल आणि रिक्रिएशन केंद्रांवर लोकांची वर्दळ बेसलाइनच्या तुलनेत सध्या ६८ टक्के कमी आहे. मात्र, लॉकडाऊनच्या वेळी हे जवळपास ८० टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. दुसरीकडे, सुपरमार्केट आणि फार्मसीमध्ये लोकांचे येणे-जाणे २०% कमी आहे. निवासी क्षेत्रांत बेसलाइन दिवसांच्या तुलनेत वर्दळ १४ टक्के जास्त आहे. बहुतांश ठिकाणी लोकांची हालचाल नकारात्मक असतानाही सुधारणा यासाठी म्हटली जाऊ शकते कारण की, देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन वेळी संबंधित ठिकाणांवर हे आकडे आणखीही जास्त नकारात्मक होते.

जम्मू-काश्मीरमध्ये या प्रमुख ठिकाणी बेसलाइन पीरियडच्या तुलनेत वर्दळ बरीच वाढली आहे. तिथे, रिटेलमध्ये १४० टक्के, सुपरमार्केटमध्ये ३९५ टक्के, पार्कमध्ये २४६ टक्के आणि रहिवासी भागात ५ टक्के वर्दळ वाढली आहे. वास्तवात काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यामुळे रहदारी कमी होती. यानंतर कोरोना आला. आता अनलॉक असताना काश्मीरमधील वर्दळीत बरीच सुधारणा दिसत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post