शरद पवारांनी केले मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था इथे झाली असती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असे काहींजणांना वाटले असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. ते अत्यंत सावधगिरीने निर्णय घेतात. त्याचे दुष्पपरिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करुन घेता येईल तेवढी करुन घेतात. त्यानंतर पाऊल टाकतात. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे, असे पवार यांनी पुढे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांना आमचा १०० टक्के मनापासून पाठिंबा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनचा काळ कसा व्यथित केला यावर बोलताना पवार म्हणाले की, मी घराच्या चौकटीच्या बाहेर गेलो नाही. स्वतःची काळजी घेतली. वाचन केलं. संपूर्ण गीतरामायण ऐकलं.
Post a Comment