एन्काऊंटरवर तापसी म्हणाली...



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला शुक्रवारी (दि. १०) रोजी पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सध्या बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तापसी पन्नूने विकास दुबे एन्काऊंटरवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की,‘असे होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता. आणि मग सगळे म्हणतात की, बॉलिवूड चित्रपटांच्या कथा या वास्तवदर्शी नसतात’.
विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला निघाले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबे यांच्यात गोळीबार झाला. यादरम्यान पोलिसांनी विकास दुबेला ठार केले. या सगळ्यात शेवटी विकास दुबेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post