जेंव्हा पवार साहेब कार्यकर्त्यांसाठी थांबवतात ताफा !
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आज राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. पण, अशाही परिस्थितीत शरद पवार हे जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. आज शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते.
त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील बाजीरावची विहीर येथे शेळवे गावालगत शरद पवारांचा भरधाव जाणारा ताफा अचानक थांबला. शरद पवारांचा ताफा थांबवण्याचे कारणही तसेच होते. शेळवे गावात राहणारे 87 वर्षांचे पांडुरंग गाजरे हे शरद पवारांवर खूप प्रेम करतात. ज्या ज्या वेळी शरद पवार हे पंढरपूरच्या दौर्यावर येतात तेव्हा आवर्जून गाजरे यांची भेट घेत असतात. त्यामुळे महामार्गावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पांडुरंग गाजरे हे उभे होते.
कार्यकर्ते राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन उभे होते. दुरूनच पवारांना याचा अंदाज आला आणि त्यांनी ताफा थांबवण्यास सांगितले. यावेळी पवारांच्या गाडीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हेसुद्धा होते. शरद पवारांनी गाडीतूनच पांडुरंग गाजरे यांची आपुलकीने विचारपूस केली. तब्येतीची माहिती जाणून घेतली. पांडुरंग गाजरे यांनी एक निवेदनही दिले. पवारांनी त्यांचे निवेदनही स्वीकारले.
Post a Comment