पहिल्या लूकमध्ये दिसली प्रभास आणि पूजा हेगडेची रोमँटिक केमिस्ट्री
माय अहमदनगर वेब टीम
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास ब-याच काळापासून त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे शूटिंग परदेशातही सुरू होते. आता या चित्रपटाचे शीर्षक आणि फर्स्ट लूक निर्मात्यांनी रिलीज केला असून यातील मुख्य कलाकार प्रभास आणि पूजा हेगडे यांची सुंदर केमिस्ट्री बघायला मिळत आहे.
या पोस्टरच्या माध्यमातून प्रभासने आपल्या चाहत्यांना भेट दिली आहे. त्याने चित्रपटाचे नवीन पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. यात पूजा हेगडे आणि प्रभास मुख्य भूमिकेत आहेत. हे सांगताना प्रभासने लिहिले, ‘माझ्या चाहत्यांसाठी खास गिफ्ट. मला आशा आहे की तुम्हाला हे आवडेल’ असे म्हटले आहे.
जेव्हा प्रभासने या चित्रपटाची घोषणा केली होती तेव्हा ‘प्रभास 20’ या हॅशटॅगने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. तेलुगू दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट एक बिग बजेट असणार असून 2021 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट एक प्रेमकथा असणार असून यामध्ये पूजा हेगडे राजकुमारीची भूमिका साकारत आहे. प्रभास चित्रपटात आपली प्रेमकथा सांगणार आहे. अर्ध्या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले आहे. मार्च महिन्यात जॉर्जियामध्ये चित्रपटाचे शूटिंग चालू होते, कोरोनाच्या आजारामुळे ते थांबावे लागले. पूजा हेगडे प्रथम आपला स्लॉट संपवून मुंबईत परतली आणि नंतर प्रभासने उर्वरित शूट लवकरच टीमबरोबर पूर्ण केले होते.
या चित्रपटात पूजा आणि प्रभास सोबतच भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन हे कलाकार देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. चाहते प्रभास आणि पूजाची केमिस्ट्री मोठया पडद्यावर पाहायला उत्सुक आहेत.
Post a Comment