सरकार पाडण्याचा कांगावाच : फडणवीस



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - ठाकरे सरकार पाडणार असल्याचा कांगावा स्वतः त्यांचेच लोक करत आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यात अपयशी ठरल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत नाही, स्वत:च मारून घ्यायचे आणि स्वत:च रडायचे, ही एक नवी पद्धत आहे. ती वापरून सरकारच्या अपयशापासून लोकांची नजर हटवण्याचा हा डाव असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ किंवा नुरा कुस्ती असून ठरवून केलेला प्रकार असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. ही मॅचफिक्सिंग संपल्यावर आपण त्यावर प्रतिक्रिया देऊ, असे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनाही उत्तर

फडणवीस यांचे डिझास्टर टुरिझम सुरू असल्याचा शेरा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मारला होता, त्यावर केवळ मंत्री बनवले म्हणजे शहाणपण येत नाही, असा टोमणा फडणवीस यांनी लगावला.
राज्यात खूप चिंताजनक अशी परिस्थिती असून अ‍ॅक्टिव्ह केसेसबरोबरच मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. कोरोनामुळे देशभरात झालेल्या मृत्यूंपैकी 46 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रातील खूप मोठ्या प्रमाणात ‘अन रजिस्टर्ड डेथ’ असल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.

घरातच मृत्यू झालेल्या 600 कोविडच्या रुग्णांची नोंदच शासनाने अपलोड केलेली नाही. जेवढी कोरोनाची लपवालपवी कराल,तेवढा कोरोनाचा प्रादुर्भाव हाताबाहेर जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

मुंबईत आजही कोरोनाच्या चाचण्या पाच साडेपाच हजारांवर जात नाहीत. मुंबईची लोकसंख्या आणि मुंबईत होणारा प्रादुर्भाव याची सरासरी 25 ते 30 टक्क्यांनी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत चाचण्या कमी झाल्यास मृत्यूचे प्रमाण वाढेल,असे सांगताना संख्या लपवण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या कमी केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post