नळाला तोट्या बसविण्याचे आदेश द्या ; महापौरांचे प्रशासनाल आदेश
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पाणी हे मानवी जीवनातील महत्वाचचे घटक आहे. पाण्यापासून विविध आजार होण्याची भिती मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पाण्याचे वारंवार नमुने घेण्यात यावेत. या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यात यावा. तसेच नगर शहरामध्ये पाणी गळती होत असल्यामुळे पाणी वाया जात आहे. लिकेज काढावे तसेच नळधारकांना तोट्या बसविण्याचे आदेश देण्यात यावेत. पाणी वाचविण्यासाठी पाणी व्यवस्थापनाची खरी गरज आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून पाणी बचतीचा संदेश नगरकरांना द्यावा असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
वसंत टेकडी येथील शहराला पाणी पुरवठा करणार्या जलकुंभाची पाहणी करताना महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संजय ढोणे, सुरज शेळके, अजय चितळे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर. जी. सातपुते, पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते. महापौर बाबासाहेब वाकळे पुढे म्हणाले की, नगर शहराला मुळाधरण ते वसंत टेकडीपर्यंतच्या अमृत पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू असून या कामाला गती देण्याणसाठी दररोज आढावा घेतला जातो. हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी आग्रही आहे.
पुढील 50 वर्षाचा विचार करून नगर शहराला केंद्र शासनाने अमृत पाणी योजनेला मंजूरी दिली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून पूर्ण दाबाने शहराला पाणी पुरवठा करणार आहे. पुढील 6 महिन्यामध्ये ही योजना मार्गी लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिलेल्या निर्देशानंतर महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शहरातील नळ धारकांनी आपल्या नळांना तोट्या बसविण्याचे निर्देश दिले आहेत.
Post a Comment