राधिकाचा ‘रात अकेली है’!




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राधिका आपटेने बॉलीवूडच्या मसालापटांच्या सुळसुळाटातही काही वेगळे चित्रपट करून आपल्या अभिनयाचा (आणि बोल्डनेसचाही) डंका वाजवलेला आहे. आता तिचा ‘रात अकेली है’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. यामध्ये तिच्यासमवेत नवाजुद्दीन सिद्दीकी आहे.

नाट्यक्षेत्राशी संबंधित अनेक कलाकार या चित्रपटात असल्याने अभिनयाची जुगलबंदीच यामध्ये पाहायला मिळू शकते. हा एक क्राईम सस्पेन्स चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन हनी त्रेहान यांनी केले आहे. हनी यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी जतिल यादव नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. हा पोलिस अधिकारी एका अतिशय श्रीमंत व्यक्‍तीच्या खुनाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत असतो. लग्‍नाच्या दिवशीच त्याचा खून झालेला असतो आणि त्याचा खून कसा झाला हे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला माहिती नसते. राधिकाने यामध्ये या श्रीमंत व्यक्‍तीच्या पत्नीची भूमिका बजावली आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. या चित्रपटात श्‍वेता त्रिपाठी, इला अरुण, शिवानी रघुवंशी, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धुलिया आणि अन्यही अनेक कलाकार असून हा चित्रपट 31 जुलैला प्रदर्शित केला जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post