'युजीसी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का'?



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सद्यस्थितीत परिक्षा घेऊ शकत नाही असा पुनरुच्चार उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आम्ही परीक्षाच घेणार नाही अस कधीही म्हटलेलं नाही असेही त्यांनी नमूद केले. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. आम्ही आमची भूमिका बदलली नसून आम्ही ठाम असल्याचे सामंत म्हणाले. वाईन शॉप आणि विद्यापीठ परिक्षांची तुलना चुकीची असल्याचे ते म्हणाले.
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्याही आम्ही विचार केला असून त्या संदर्भात अहवाल आपल्याकडे प्राप्त झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. कुलगुरूंनी एटीकेटी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भविष्याचा नक्की विचार केला असल्याचे  मंत्री सामंत यांनी  सांगितले. विद्यार्थी आणि पालकांचा परिक्षा घेण्याला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना  संकट दूर गेल्यानंतर आम्ही परिक्षा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. युजीसीपेक्षा राज्य सरकार अधिक अधिकार आहेत. युजीसीला दिलेल्या पत्रात आम्ही बदल केलेला नाही असेही त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post