खुनाचा प्रयत्न करणार्या एकास गावठी कट्ट्यासह अटक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शेतजमीनीत दारुचा धंदा करण्यासाठी जमिन न दिल्याचा मनात राग धरुन गावठी कट्टा रोखून व तलवारीने तुकडे करुन ठार मारण्याची धमकी देवून खुनाचा प्रयत्न करणार्या अनिकेत दत्तात्रय कोठावळे (वय 23, रा.सांगवी सुर्या, ता.पारनेर) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.30) केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सांगवी सुर्या येथे विलास रामदास कोठावळे (वय 42) यांना त्यांच्या सांगवी सुर्या येथील शेत जमिनीत दारुच्या धंद्याकरीता अनिकेत कोठावळे यांनी मागितली. विलास कोठावळे यांनी जमिन देण्यास नकार दिल्याने अनिकेत याने गावठी कट्टा रोखून तलवारीने तुकडे करुन ठार मारण्याची धमकी दिली व त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
गुन्हा नोंदवताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी सांगवी सुर्या येथे सापळा रचला व अनिकेत कोठावळे यास अटक केली. त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, चारशे रुपये किंमतीची दोन काडतुसे तथा हजार रुपयांचा मोबाईल असा 35 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला.
Post a Comment