अनुपम खेर यांच्या आईची कोरोनावर मात
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या आईने यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. याबद्दल माहिती देण्यासाठी तसेच डॉक्टर आणि चाहत्यांचे आभार मानण्यासाठी ट्विटरवर अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला. गेल्या आठवड्यात अनुपम यांच्या घरातील चौघांचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. अशी माहिती त्यावेळी खेर यांनी ट्विटरवरवर व्हिडीओ शेअर करून दिली होती. त्यांची आई, भाऊ, वहिणी आणि भाचा या चौघांना करोनाची लागण झाली झाल्याने त्यांच्या घरात चिंतेचं वातावरण होते.
अनुपम खेर यांच्या आईवर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. पाच-सहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना आता घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या होम क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत.
Post a Comment