शेखर गायकवाड राज्याचे नवे साखर आयुक्त
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली झाली असून त्यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त होण्यापूर्वी शेखर गायकवाड हे राज्याचे साखर आयुक्त होते. तीन महिन्यापूर्वी त्यांची पुणे आयुक्त पदी बदली झाली होती.
शनिवार रोजी राज्य सरकारने 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्त पदी बदली. तर त्यांच्या जागी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची पुणे महापालिका आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
साखर आयुक्त सौरव राव यांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (पुणे विभागीय आयुक्त) पदावर बदली झाली आहे. कृषी आयुक्त सुहास डीवसे यांची पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंचरचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र दुदी यांची सांगली जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
Post a Comment