सुशांतच्या 'दिल बेचारा'तील गाणे पाहाच
माय अहमदनगर वेब टीम
सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा'मधील गाणे रिलीज झाले आहे. दिल बेचारामध्ये संजना सांघी आणि सुशांतच्या मुख्य भूमिका आहेत. गाण्यामध्ये सुशांत सिंह राजपूतचा डान्स आणि त्याचा अंदाज पाहण्यासारखा आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये सुशांत सिंह राजपूत खास अंदाजात एंट्री करताना दिसतो. विशेष म्हणजे, दिल बेचारामधील या गाण्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. फॅन्स केवळ सुशांत सिंह राजपूतची तारीफच नाही तर कॉमेंटच्या माध्यमातून त्याची आठवणदेखील करत आहेत.
सुशांत सिंह राजपूतचा अंदाज कुल दिसत आहे. सुशांत-संजनाची ही जोडी ओटीटी प्लॅटफार्मवर रिलीज होणार आहे. दोन कॅन्सर रूग्णांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट जॉन ग्रीन यांची कादंबरी 'द फॉल्ट इन ऑर स्टार्स'वर आधारित आहे.
सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर फॅन्सने 'दिल बेचारा' मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याची मागणी केली होती. चित्रपटाचा 'दिल बेचारा'चा ट्रेलरदेखील फॅन्सच्या पसंतीस उतरला आहे. आता सुशांतचे फॅन्स हा चित्रपट रिलीज होण्याची प्रतीक्षा करत आहेत. सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Post a Comment