देशात दिवसभरात २८,६३७ रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात कोरोना संसर्ग दररोज नवनवी उच्चांकी पातळी गाठत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी उच्चांकी भर नोंदवण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक 28,637 रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे, तर 500 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्‍त केली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. देशातील कोरोनामुक्‍तीचा दर त्यामुळे 63 टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत देशात 28 हजार 637 कोरोनाग्रस्त आढळून आले, तर 551 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. 19 हजार 235 कोरोनामुक्‍त रुग्णांना शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 8 लाख 49 हजार 553 झाली आहे. यातील 5 लाख 34 हजार 621 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. 2 लाख 92 हजार 258 रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे देशातील 22 हजार 674 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्‍त रुग्णांचे प्रमाण हे सक्रिय रुग्णांच्या तुलनेत 2 लाख 42 हजार 363 ने अधिक आहे. शनिवारी सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत 8 हजार 851 ने वाढ नोंदवण्यात आली. देशातील कोरोनामुक्‍तीचा दर हा 62.93 टक्के नोंदवण्यात आला आहे.

सर्वाधिक कोरोना प्रभावित महाराष्ट्रात शनिवारी उच्चांकी 8 हजार 139 कोरोनाबाधितांची भर पडली. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू (3,665),  कर्नाटक (2,798), आंध्र प्रदेश (1,813), दिल्ली (1,781), उत्तर प्रदेश (1,392), पश्‍चिम बंगाल (1,344) तसेच तेलंगणात (1,178) सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले. या राज्यांच्या खालोखाल आसाम (936), गुजरात (872), बिहार (798), हरियाणा (648) तसेच राजस्थानमध्ये (574) कोरोनाबाधितांची लक्षणीय वाढ दिसून आली. ईशान्येकडील सिक्‍कीम तसेच अंदमान-निकोबारमध्ये सर्वात कमी अनुक्रमे 151 आणि 163 कोरोना रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात शनिवारी 4 हजार 360 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. राज्यातील कोरोनामुक्‍तीचा दर त्यामुळे 55.55 टक्के झाला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 223 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर त्यामुळे 4.1 टक्के नोंदवण्यात आला आहे. 6 लाख 80 हजार 17 नागरिक घरगुती विलगीकरणात आहेत, तर 47 हजार 376 नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (70), तामिळनाडू (69), दिल्ली (34), पश्‍चिम बंगाल (26), आंध्र प्रदेश (17), गुजरात (10), हरियाणा (7) तसेच राजस्थानमध्ये (6) रुग्णांचा मृत्यू झाला

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post