पायलटांना कामांपेक्षा लावालावी, पाडापाडीत रस!



माय अहमदनगर वेब टीम
जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. पक्षाने संयमी भाषा वापरण्याचा सल्ला गेहलोत यांना दिलेला असला, तरीही पायलट हा दीडदमडीचा माणूस आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या या माजी सहकार्‍यावर निशाणा साधला. 

गेहलोत म्हणाले की, राजस्थानात जो सत्तासंघर्ष सध्या सुरू आहे, तो 10 मार्च रोजीच सुरू होणार होता. पायलट यांना खटला लढवण्यासाठी पैसा कोण पुरवत आहे, असा सवाल करून गेहलोत यांनी भाजपवरही शरसंधान केले आहे.


 
गेहलोत म्हणाले, पायलट गेली 7 वर्षे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. गांधी माय-लेकांनी दाखविलेल्या विश्वासाचा घात करून पायलट  गेल्या 6 महिन्यांपासून भाजपबरोबर पक्षात फूट पाडण्याचा कट रचत होते. पायलट कुचकामी असूनही आम्ही एकदाही प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना हटवण्याची मागणी केली नाही, असेही गेहलोत म्हणाले. 

पायलट यांच्यासाठी भाजपचे फंडिंग

सचिन पायलट हे 10 मार्चला हरियाणातील मानेसरला गेले होते. कॉर्पोरेटकडून, भाजपकडून त्यांना पैसा पुरवला जातो आहे; पण आम्ही त्यांचा हा कट उधळून लावला. मीही मुख्यमंत्री आहे. मी काही वांगी विकायला राजधानीत आलेलो नाही, अशी मल्लीनाथी गेहलोत यांनी केली. आता आमदार म्हणून पात्रतेचा पायलट यांचा खटला जे वकील लढवत आहेत ते सर्व तगडी फी घेणारे वकील आहेत. सचिन पायलट हा दीडदमडीचा माणूस या वकिलांना पैसा पुरवणार आहे काय, असा सवाल त्यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post