अहमदनगर- नगर शहर परिसराला बुधवारी (दि.22) दुपार नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहर परिसरात थोड्याच वेळात पाणीच पाणी झाले होते. शहराच्या सावेडी भागात सुमारे 47.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहर परिसरात बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसास सुरुवात झाली. सुमारे 1 तासभर पाऊस कमी-जास्त प्रमाणात सुरू होता. त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाच्या फरकाने शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झालेले पहावयास मिळाले.
सर्वाधिक पाऊस सावेडी परिसरात झाला असून सावेडी मंडल कार्यालयात 47.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नालेगाव मंडलात 12.8 मिमी, केडगाव परिसरात 4 मिमी, भिंगार परिसरात 2.8 मिमी, नागापूर परिसरात 15 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरा जवळील नगर तालुक्यातील जेऊर मंडलात 47.5 मिमी पाऊस कोसळला. त्या पाठोपाठ वाळकी मंडलात 37.3, चास मंडल 9.5, रुईछत्तीशी मंडलात 4.5, कापूरवाडी मंडलात 12, चिचोंडी पाटील मंडलात 12.5 असा एकूण सरासरी 18.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सरासरी 9.8 मिमी पाऊस
जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये बुधवारी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामध्ये नगर 18.7 मिमी, पारनेर 10.6 मिमी, श्रीगोंदा 13.2 मिमी, कर्जत 1.1 मिमी, जामखेड 5.3 मिमी, शेवगाव 26.6, पाथर्डी 15.1 मिमी, नेवासा 14.3, राहुरी 10.6, संगमनेर 0.1 मिमी, अकोले 0.1 मिमी, कोपरगाव 8.3, श्रीरामपूर 2.0, राहाता 5.6 असा पाऊस झाला आहे.
Post a Comment