हे पदार्थ पावसाळ्यात खाणे टाळायला पाहिजे...
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे, उघड्यावरचे पदार्थ खालल्याने जंतूसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ टाळले पाहिजे.
* या दिवसात सॅलेड खाणं टाळावं.
* पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या टाळल्या पाहिजेत.
* कापल्यानंतर फळं लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते.
* पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत.
* पावसाळ्यात भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगतं. त्यामुळे भात प्रमाणात खावा.
* मीठामळे पोट फुगतं आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसात मीठही कमीच खावं.
* पचनास जड असणार्या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत.
* दह्यामुळे कफ होतो.
* शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचं प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.
Post a Comment