देशात कोरोना रुग्ण ८ लाखापार


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 8 लाखांचा आकडा ओलांडला असून, मृतांची संख्या 22 हजारांवर गेली आहे. गेल्या चोवीस तासांत रुग्णसंख्या 27 हजार 449 ने वाढत 8 लाख 21 हजार 722 वर गेली असून, मृतांचा आकडा 520 ने वाढला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आली.

रुग्णसंख्या 7 लाखांवरून 8 लाखांवर जाण्यासाठी केवळ चार दिवस लागले. एका दिवसात 27 हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या आठवडाभरात पहिल्यांदाच रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पाचशेच्या वर गेला आहे. याआधी 4 जुलै रोजी सर्वाधिक 608 रुग्णांचा मृत्यू झाला होता.संपूर्ण जून महिन्यात रुग्णसंख्या 4 लाखांनी वाढली होती, त्या तुलनेत जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच देशातील रुग्णांची संख्या 2.36 लाखांनी वाढली आहे. पूर्ण जून महिन्यात 12 हजार लोकांचा मृत्यू झाला होता, त्या तुलनेत जुलैच्या पहिल्या 10 दिवसांत 4,733 लोकांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णसंख्यावाढीच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असून, मागील चोवीस तासांत राज्यातील रुग्णसंख्या 7,862 ने वाढली आहे. याच काळात 226 लोक मृत्युमुखी पडले आहेत. आठ राज्यांत रुग्णसंख्यावाढीचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे.

कर्नाटकात 2,313 रुग्ण नव्याने आढळले आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशात 1,608, उत्तर प्रदेशात 1,347, पश्‍चिम बंगालमध्ये 1,198, गुजरातमध्ये 875, ओडिशामध्ये 755, केरळमध्ये 416, तर मणिपूरमध्ये 147 रुग्ण आढळले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post