आहार कसा घ्यावा ? हे नक्की कराचं



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पचन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी व आपल्या शरीराला आवश्यक ती सर्व पोषकतत्वे जास्तीतजास्त मिळण्यासाठी जेवण करण्याची शिस्तबद्ध पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे. यामध्ये जेवणाच्या वेळा कोणत्या असाव्या, जेवणाचे प्रमाण किती असावे, जेवायला कसे बसावे, कसे जेवावे, किती जेवावे, जेवणानंतर लगेच काय करावे या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.

जेवणाच्या वेळेच्या बाबतीत म्हणाल, तर तुमचे सकाळचे जेवण सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान तुमच्या सोयीप्रमाणे एक वेळ निश्‍चित करून त्या वेळी नियमितपणे वेळच्या वेळी जेवावे. तुमचे संध्याकाळचे जेवण संध्याकाळी सहा ते रात्री नऊच्या दरम्यान एक वेळ निश्‍चित करून त्यावेळी नियमितपणे वेळच्यावेळी जेवावे.
पचन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी व आपल्या शरीराला आवश्यक ती सर्व पोषकतत्वे जास्तीतजास्त मिळण्यासाठी जेवण करण्याची शिस्तबद्ध पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे. यामध्ये जेवणाच्या वेळा कोणत्या असाव्या, जेवणाचे प्रमाण किती असावे, जेवायला कसे बसावे, कसे जेवावे, किती जेवावे, जेवणानंतर लगेच काय करावे या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.

जेवणाच्या वेळेच्या बाबतीत म्हणाल, तर तुमचे सकाळचे जेवण सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान तुमच्या सोयीप्रमाणे एक वेळ निश्‍चित करून त्या वेळी नियमितपणे वेळच्या वेळी जेवावे. तुमचे संध्याकाळचे जेवण संध्याकाळी सहा ते रात्री नऊच्या दरम्यान एक वेळ निश्‍चित करून त्यावेळी नियमितपणे वेळच्यावेळी जेवावे.


म्हणजे यातून लक्षात काय घ्यायचे आहे, तर जो माणूस सारखे तासातासाला काहीतरी काहीतरी खात असतो त्याच्या शरीरात सारखेच इन्सुलिन स्रवत राहते. परिणामी, त्याच्या रक्तात नेहमीच इन्सुलिनची पातळी वाढतच राहते आणि या इन्सुलिनची भूमिका काय असते, तर तुमचे अन्न पचन झाल्यावर जे अंतिम साध्य बनते ते असते साखर व ते ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम असते इन्सुलिनचे. मात्र, जो माणूस तासातासाला काहीतरी खातच असतो त्याच्या शरीरात सारखेच इन्सुलिन स्रवत राहते. परिणामी, त्याच्या रक्तात नेहमीच इन्सुलिनची पातळी वाढत राहते. त्यामुळे त्याच्या पेशींनाही त्या इन्सुलिनचा कंटाळा येतो. शिसारी बसते. त्यामुळे पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीर्तें ज्याला वैद्यकीय भाषेत ‘इन्सुलिन रेजिस्टन्स’ असे म्हणतात. अशा प्रकारे आपल्या शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो. परिणामी, रक्तातील ग्लुकोज जे इन्सुलिनमार्फत पेशींपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे ते पोहोचवले जात नाही. ते रक्तातच पडून राहते व कालांतराने जेव्हा रक्त तपासणी केली जाते तेव्हा रक्तात ग्लुकोज म्हणजे साखर आढळते व मधुमेहाचे निदान केले जाते आणि आयुष्यभरासाठी उपचार सुचवले जातात; मात्र जर तुम्ही तुमच्या कोणत्याही दोन वेळच्या जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर ठेवले व या चार तासांत काहीही न खाता, चहासुद्धा न पिता फक्त पाणी किंवा प्लेन ताक एवढेच घेण्याची सवय लावली, तर उभ्या आयुष्यात तुमच्या शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होणार नाही व इन्सुलिन रेजिस्टन्समुळे होणारा अशा प्रकारचा मधुमेह तुम्हाला या जन्मात होणार नाही.

आता वजन कमी करण्याची वेळ येणार नाही. का येणार नाही? तर, आताच सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण खातो, खाल्लेले अन्न जेव्हा पोटात जाते तेव्हा आपल्या स्वादुपिंडामधून तासाभरासाठी इन्सुलिन स्रवायला लागते. तासाभरानंतर आपण काहीच खाल्ले नाही, तर निसर्गनियमाप्रमाणे हे इन्सुलिन स्रवणे थांबते व स्वादुपिंडामधूनच इन्सुलिनच्या विरुद्ध काम करणारे दुसरे संप्रेरक स्रवायला लागते त्याचं नाव आहे ‘ग्लुकागॉन’ आणि या ग्लुकागॉनची भूमिका काय, तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी जाळणे. म्हणजेच अतिरिक्त फट बर्न करणे; मात्र जी लोकं सारखे तासातासाला काहीतरी खातच असतात त्यांच्या शरीरात सारखे इन्सुलिनच स्रवत असतं. ग्लुकागॉन स्रवतच नाही. परिणामी, त्यांच्या शरीरातील अतिरिक्त चरबी जी जळायला पाहिजे ती जळत नाही. ती शरीरात साचायला लागते. कालांतराने ती चरबी साचून साचून त्यांचं वजन वाढतं. म्हणून एवढी साधीसोपी सवय लावायची, काय करायचे आहे, तर तीन वेळा जेवायला काहीच हरकत नाही; पण काळजी मात्र एवढीच घ्यायची आहे, की तुमच्या कोणत्याही दोन वेळच्या जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर ठेवा व या चार तासांत काहीही खायचे नाही. चहासुद्धा प्यायचा नाही. फक्त पाणी किंवा प्लेन ताकच प्यायचे आणि एवढी साधीसोपी सवय लावली तर या जन्मात तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्समुळे होणारा मधुमेह होणार नाही व वजन कमी करण्याची वेळही येणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post