कोरोनामुळे यावर्षीचा बागुलु पंडुगा घरीच साधेपणाने साजरा करा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना संकटामुळे यावर्षी येत्या 10 जुलै रोजी साजरा होणारा बागेचा सण (बागुलु पंडुगा) प्रत्येकाने आपल्या घरीच साधेपणाने साजरा करावा असे आवाहन तोफखाना येथील शितळादेवी सेवा मंडळ व शितळादेवी सेवा प्रतिष्ठान (ट्रस्ट) च्यावतीने शहरातील सर्व पद्मशाली समाजाला केले आहे.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आवाहनात म्हंटले आहे की, येत्या 10 जुलै शुक्रवार रोजी सालाबादप्रमाणे येणारा बागेचा सण (बागुलु पंडुगा) साजरा होणार आहे. परंतु सध्या संपूर्ण जग हे कोरोना नावाच्या महामारीने त्रस्त आहे. आपला देश, राज्य आणि आपले नगर शहर सुद्धा त्यातून सुटलेले नाही. अशा परीस्थितीत शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सध्या सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. महाराष्ट्राचं सर्वोच्च ’श्रद्धास्थान’ पंढरपूर देखील बंद आहे. अशा पार्श्वभूमिवर बागेचा सण येत आहे.

तरी सर्व समाजबांधवांनी यंदाचा बागेचा सण सर्व नियमांचं पालन करून घरीच साजरा करावा. रूढी परंपरेनुसार जे काही विधी असतील ते घरातच करावेत व शासकीय नियमांचं काटेकोर पालन करुन ’कोरोना’ सारख्या महामारीला हरविण्यात आपलाही सहभाग नोंदवावा. मंदिर बंद रहाणार आहे, कोणीही देवीच्या पायरी वर नैवेद्य ठेवुन नैवेद्याचा अवमान करू नये, घरातच देवासमोर नैवेद्य ठेवावा, कायद्याचे पालन करून शासनाला सहकार्य करावे, सणाचे पावित्र्य सांभाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post