आंध्रप्रदेश - तिरूमला तिरूपती देवस्थानचे 91 कर्मचारी करोनाबाधित आढळल्याची माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकार अनिल कुमार सिंघल यांनी दिली आहे.
देवस्थानतर्फे तिरूमला मंदिरातील 1865, अलिरी मंदिरातील 1704 आणि 631 भाविकांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी तिरूमला मंदिरातील 91 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एकाही भाविकाचा समावेश नाही. 11 जून ते 10 जुलै या काळात 2 लाख 2 हजार 346 भाविकांनी ऑनलाईन दर्शन पास घेतला होता. त्यापैकी 1 लाख 64 हजार 742 भाविकांनी तिरूपती मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. यापैकी 2600 भाविकांशी थेट संपर्क करून मंदिर व्यवस्थापनाने त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी केली. हे सर्व भाविक निरोगी असल्याचे सिंघल यांनी सांगीतले.
Post a Comment