राज्यसभेचे नवीन सदस्य २२ जुलैला घेणार शपथ
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राज्यसभेतील नवनिर्वाचित सदस्य 22 जुलै रोजी सदनाच्या चेंबरमध्ये शपथ घेतील. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी पहिल्यांदाच सदस्यांना अशा पद्धतीने शपथ घ्यावी लागणार आहे.
राज्यसभेच्या अधिकार्यांनी सांगितले, की प्रत्येक सदस्याला आपल्यासोबत केवळ एकाच व्यक्तीला आणण्याची परवानगी असेल. राज्यसभा आणि लोकसभेशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या बैठका सुरू करण्याचा आणि त्या बैठकीत सदस्यांच्या सहभागाची इच्छा लक्षात घेऊन राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या महासचिवांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना 22 जुलै रोजी शपथविधी होणार असल्याचे लेखी कळवले आहे. जे सदस्य या दिवशी येऊ शकणार नाहीत, त्यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शपथ दिली जाईल.
Post a Comment