ही आहे लक्षणे दिसली तर समजून घ्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नाही !



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क – तुम्ही जास्त प्रमाणात गोड खात असाल आणि तुम्हाला शरीरातील साखरेचं प्रमाण ओळखायचं असेल तर कसं ओळखाल हे आपण आज जाणून घेऊयात. खालील गोष्टी होत असेल तर समजून शरीरातील सारखेरचं प्रमाण नियंत्रणात नाही.

1) गोड खावसं वाटणं – सर्वात आधी तर गोड खाण्याची सवय कंट्रोल करा. कारण तुम्ही गोड खात असाल तर सतत गोड खावं वाटतं. यामुळं साखरेची पातळी वाढते यामुळं गंभीर आजारांची शक्यता असते.

2) सुरकुत्या येणं – कमी वयात सुरकुत्या येणं हे जास्त साखर खाण्याचं लक्षण आहे. यासाठी साखरेचं सेवन बंद करा. जास्त साखरेच्या सेवनानं शरीरातील कोलोजन आणि इलास्टीजनचं प्रमाण वाढतं.

3) फॅट्स वाढणं – साखरेच्या जास्त सेवनानं शरीरात अतिरीक्त चरबी जमा होते. पोट, मांड्या आणि हातांची त्वचा लटकत असेल तर समजू घ्या चरबी वाढत आहे. यामुळं लठ्ठपणाही येतो. यापासून सुटका हवी असेल तर सारखरेचं सेवन बंद करा.

4) दात किडणं – जर तुमचे दात जास्त सडत असतील किंवा किड लागली असेल तर साखरेचं सेवन बंद करा. कारण जास्त गोड खाल्ल्यानंच ही समस्या उद्भवते.

5) शरीराला सूज येणं – साखरेचं अतिसेवन केलं तर पायांसहित शरीरातील इतर भागांनाही सूज येते. त्यामुळं अशी लक्षणं जाणवल्यास लगेच साखरेचं सेवन बंद करा.

6) गॅस होणं – साखरेमुळं पचनक्रिया मंदावते. यामुळं गॅस होणं हेही स्वाभाविक आहे. कधी पोट साफही होत नाही. अशी लक्षणं आढळल्यास त्वरीत साखरेचं सेवन बंद करा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post