…तर पुन्हा सक्तीचे लॉकडाऊन ; यांनी दिला इशारा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -  नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी नागरिकांना वारंवार सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्यानंतरही स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी न घेता अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अखेर पुन्हा सक्तीचे लॉकडाऊन टाळायचे असेल तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, असा इशाराच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.

मुख्य बाजारपेठेचा परिसर सुद्धा कंटेन्मेंट व बफर झोनमध्ये आला असल्यामुळे ती देखील बंद आहे. मात्र, त्यानंतरही नगरमधील इतर भागातील गर्दी कमी होत नसल्याचे प्रकार समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेकजण कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता, तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरताना आढळत आहेत. त्यामुळे आता विनाकारण फिरणे टाळा अन्यथा सक्तीने लॉकडाऊन करण्याचा इशाराच जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच चेहर्‍यावर मास्क घालून घराबाहेर पडावे. कोणत्याही परिस्थितीत करोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post