बेपत्ता हॉलिवूड अभिनेत्रीचा मृतदेह आढळला
माय अहमदनगर वेब टीम
न्यूयॉर्क - सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल, गायिका नाया रिवेराचा मृतदेह सरोवरात सापडला आहे. एक आठवड्यानंतर पीरू सरोवरात तिचा मृतदेह आढळला. कॅलिफोर्नियातील पीरू सरोवरात ८ जुलैला ती आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत पोहोण्यासाठी गेली होती.
सरोवराच्या मधोमध बोटीत तिचा ४ वर्षांचा मुलगा आढळला होता. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. आणि शोधकार्यानंतर तिचा मृतदेह सापडला.
अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये नायाने काम केले होते. हिट म्युझिकल सीरीज 'Glee' मुळे ती प्रसिध्द झाली होती. नाया रिवेरा ८ जुलैला आपल्या मुलाला घेऊन पीरू सरोवरात गेली होती. तेथे तिने ३ तासांसाठी बोट भाडयाने घेतले होते.
Post a Comment