तुकाराम मुंढेंना पाठिंबा देण्यासाठी समर्थक रस्त्यावर
माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - नागपूरचे महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी यांच्यातील वाद विकोपाला जात असल्याचे चित्र सध्या नागपुरात आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील सर्वसामान्य जनतेने तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांना वारंवार विरोध होत असल्याचे कारण पुढं करून मुंढे यांच्या समर्थनार्थ काही सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मुंढे यांचे समर्थन करीत आहेत. 'सारे नागपूर की शान.. तुकाराम मुंढे महान"अशा आशयाचे फलक हातात घेऊन काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नागपुरात मोहिम चालविली आहे. नागपूरचा विकास करायचा असेल तर आयुक्त तुकाराम मुंढेच हवे असे या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच तुकाराम मुंढे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांच्यामुळे नागपूर शहरातील अनेक विकास कामे झाली आहेत. सर्वसामान्यांना हक्काच्या बाबी मिळाल्या आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांना हे पचत नाही. त्यामुळे ते तुकाराम मुंढे यांच्यावर खोटे आरोप करत असल्याचे या सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हटले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे हे महानगर पालिकेत आल्यानंतर त्यांनी महानगर पालिकेचे लाखो रुपये वाचवले आहेत. सोबतच शहरातील कामांना गती देण्याचे काम तुकाराम मुंढे यांनी केले असे मुंढे समर्थक नागपुरकरांना सांगत आहेत.
Post a Comment