मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समोर प्रा.गाडे यांनी मांडली नगरची परिस्थिती
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगरर - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी शिवसेनेच्या राज्यातील जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. नगरमधून दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी यात ऑनलाईन सहभाग घेतला. नगर जिल्ह्यातील करोना स्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना याची माहिती देताना प्रा.गाडे यांनी करोना चाचणी अहवाल जलद मिळणे अपेक्षित असल्याचे सांगितले. चाचणी अहवाल लवकर मिळाल्यावर उपचार लवकर होऊन संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल असे प्रा.गाडे यांनी निदर्शनास आणून दिले. गाडे यांनी जिल्ह्यातील खतटंचाई व बियाणांची उपलब्धता याविषयी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी प्रा. गाडे यांनी संवाद साधला. लॉक डाऊन मधील हा तिसरा संवाद होता. यावेळी प्रा.गाडे म्हणाले की , कोरोनाचा मृत्युदर नगर जिल्हयात वाढत असुन रोज शंभरपेक्षा जास्त रुग्ण बाधीत होत आहेत. तसेच रुग्णांचा तपासणी अहवाल मिळण्यास ५ ते १० दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे बाधीत व्यक्तींची संख्या वाढत आहे. तपासणी अहवाल त्वरीत मिळण्याची व्यवस्था करावी. तसेच नगर जिल्ह्यात खतांचा मोठया प्रमाणात तुटवडा आहे. खतांच्या दुकानांसमोर मोठया रांगा लागत आहेत. खतांचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी गाडे यांनी केली. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे, मात्र सोयाबीनचे बहुतांशी बीयाने उगवले नाही त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्याने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी. नगर जिल्हा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. मात्र दूधाचे भाव वाढत नसल्याने दुध व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे दुधाचे दर वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गाडे यांचे मुद्दे स्वत नोंद करून घेत ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
Post a Comment