धनंजय महाडिक यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन पोस्ट केला असून त्याला 'लेटपोस्ट' असा हॅशटॅग दिला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट आज जवळपास एका तासांपूर्वी केली आहे. महाडिक यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे पूर्वीश्रमीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आणि भाजपला विरोधात बसावे लागले. काही आठवड्यांपूर्वीच भाजपची राज्य कार्यकारणी जाहीर झाली होती. त्यानतंर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजपच्या नेत्यांनी दिल्ली वारीही केली होती. यावेळी दिल्लीतील भेटीत साखर कारखाण्याच्या प्रश्नाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीचे अनेक अन्वयार्थ काढले जात आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी या भेटीचा कोणताही संदर्भ आपल्या पोस्टमधून दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी या भेटीचे अनेक अर्थ काढले आहेत.
Post a Comment