मुलाच्या शिक्षणासाठी गाय विकणाऱ्या 'त्या' कुटुंबासाठी सोनू सूद सरसावला


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना काळात अनेक परप्रांतीय मजुरांसाठी सुपरहिरो ठरलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आता आणखी एका कुटुंबासाठी देवदूत बनला आहे. आपल्या मुलाच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गाय विकणाऱ्या कुटुंबाच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे.  

हिमाचल प्रदेशमध्यील कांगडा जिल्ह्यातील ज्वालामुखी या गावात छोट्याशा झोपडीत कुलदीप हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. कुमार यांची दोन मुले चौथीत आणि दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत आहेत. सध्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी चांगला मोबाईल नसल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी एकमेव उत्पन्नाचे साधन असणारी गाय विकली आणि त्यातून आलेल्या पैशांतून त्यांनी मोबाईल घेतला. सोनूला हे वृत्त समजल्यानंतर कुटुंबाच्या मदतीसाठी तो सरसावला आहे. सोनूने ट्विटरवर वृत्त वाचल्यानंतर ट्विट करत तत्काळ या कुटुंबाची माहिती मागितली आणि या कुटुंबाला गाय परत मिळवून देण्याबाबत म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post