मागील ७ महिन्यात सोन्याच्या किंमतीत २५ टक्के वाढ
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वेगाने वाढत होत आहे. शुक्रवारी सकाळी सोन्याच्या किंमतीने ५० हजार ८७० हा उच्चांक दर गाठला तर ५० हजार ७२५ दर निच्चांक होता. वायदा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर १० ग्रॅमला ३४८ रुपयांनी वाढून ५० हजार ४१८ इतके झाले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिलिव्हरी सोन्याच्या कराराची किंमत ऑगस्टमध्ये ३४० रुपये म्हणजे ०.६८ टक्क्यांनी वाढून ५० हजार ४१८ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.
व्यापा-यांनी नवीन खरेदी केल्यामुळे सोन्याची किंमत वायदा बाजारात वाढली. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.६८ टक्क्यांनी वधारून ते १ हजार ८७७.८० डॉलर प्रति औंस झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यानंतर दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत ५०२ रुपयांनी वाढ झाली. सोन्याच्या किंमतीने १० ग्रॅममागे ५१ हजारांचा टप्पा ओलांडला. मार्केट बंद होण्यापूर्वी सोन्याचे दर ५० हजार ९४१ रुपये प्रति ग्रॅम इतके होते. तर चांदी ६९ रुपयांनी घसरून ६२ हजार ७६० प्रति किलोग्रॅम भाव होता.
Post a Comment