मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांची पत्नी नताशा स्टॅनकोविच हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याने ही माहिती त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना दिली आहे.
हार्दिकच्या कुटुंबातील नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रसुतीपूर्वी नताशा आणि हार्दिकचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात दोघांनी प्रसूतीसाठी जाताना आपला फोटो शेअर केला होता.
नववर्ष २०२० चा मुहूर्त साधून टी - २० स्टार हार्दिक पांड्याने मॉडेल नताशा स्टॅनकोविक सोबत एक रोमँटिक साखरपुडा केला होता. त्यानंतर सगळे जग लॉकडाऊनमध्ये असताना हार्दिकने अचानक नताशा गर्भवती असल्याचे जाहीर करुन त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन त्याचे आणि गर्भवती नताशाचे फोटो शेअर केले हेतो. यावेळी त्याने 'नताशा आणि माझा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत सुखकर सुरु आहे आणि आता हा आणखी सुखकर होणार असल्यचे म्हटले होते.
Post a Comment