देशात ३८ हजार ९०२ नव्या रुग्णांची भर, ५४३ जणांचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. देशात गेल्या चोवीस तासात ३८ हजार ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ५४३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १० लाख ७७ हजार ६१८ झाली आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
वाचा :दिल्लीत १५ फुट पाण्यात अडकली बस; अन्...
कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याने काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सद्या देशात ३ लाख ७३ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील ६ लाख ७७ हजार ४२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २६ हजार ८१६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाने आता हातपाय पसरण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.
Post a Comment