मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टिकास्त्र सोडले आहे. ''आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपमधील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छूक असले तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या, असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!'' असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Post a Comment