कोरोना: चांगली बातमी...पुढील महिन्यात रशियाची लस उपलब्ध होणार!




माय अहमदनगर वेब टीम
मॉस्को - जगभरात २०० हून अधिक देशांमध्ये थैमान घालणाऱ्या करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोना प्रतिबंधक लशीची जगभरात प्रतिक्षा केली जात असताना रशियाने चांगली बातमी दिली आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये बाजारात करोनाची लस उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात या लशीला मान्यता मिळू शकते असे रशियन वैज्ञानिकांनी म्हटले आहे. त्यामुळे रशियाची करोना लस बाजारात सर्वात प्रथम दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

सीएनएनसोबत बोलताना रशियन शास्त्रज्ञांनी सांगतिले की, करोना लशीला १० ऑगस्टपूर्वीच मंजूरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही लस मॉस्को येथील गामालेया इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. ही लस सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून १० ऑगस्टपर्यंत लस उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. पहिल्यांदा ही लस रशियातील आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाच्या संसर्गाला अटकाव होईल आणि आरोग्य कर्मचारी कोणत्याही भीतीविना उपचार करतील असे रशियन शास्त्रज्ञांनी म्हटले. 

रशियन सोवरन वेल्थ फंडचे प्रमुख किरील मित्रिव यांनी म्हटले की, हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे. आम्ही अंतराळात पहिल्यांदा स्पूटनिक हा उपग्रह सोडला होता. आताची परिस्थितीही तशीच असून अमेरिका रशियाच्या यशामुळे आश्चर्यचकीत होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post