स्वदेशी करोना लसीची मानवी चाचणी



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सीन Covaxin या करोना लसीची मानवी चाचणी एम्स रुग्णालयात सुरु करण्यात आली आहे. India’s first Covid-19 vaccine trial begins at AIIMS 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 30-year-old given 1st dose इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. भारत बायोटेक Bharat Biotech या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी कोव्हॅक्सीन ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.

स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. कोव्हॅक्सीन लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित 30 वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. मानवी चाचणी कऱण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली.

कोव्हॅक्सीन लस हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून तयार केली जात असून यासाठी त्यांनी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी ICMR-National Institute of Virology यांच्याशी हातमिळवणी केली आहे. नुकतंच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.

पहिल्या टप्प्यात 375 जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये एम्स रुग्णालयातील 100 जण असणार आहेत. एम्सच्या एथिक्स कमिटीकडून चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक बनण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही तासातच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला होता.

पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार असून यामध्ये 18 ते 55 वयोगटातील व्यक्ती असणार आहेत. यामध्ये गर्भवती नसणार्‍या महिलांचाही समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर 14 दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. कोव्हॅक्सीन च्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने Indian Council of Medical Research (ICMR) देशभरात निवडलेल्या 12 ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स हे एक ठिकाण आहे. AIIMS Delhi दुसर्‍या टप्प्यात सर्व 12 ठिकाणांवरील एकूण 750 जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post