सुशांत प्रकरणी कंगनाला द्यायचा आहे जबाब
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिज्म, ग्रुपीझम, इन्सायडर्स आणि आउटसायडर्सवरून वाद सुरू आहे. कंगना राणावतने सुशांतच्या सुसाईडला प्लॅन्ड मर्डर म्हटलं आहे. या प्रकरणावरून कंगनाने अनेक बॉलिवूडच्या अनेक बड्या दिग्गज मंडळींवर आरोप केले आहेत. कंगनाने हेदेखील म्हटले आहे की, तिला या प्रकरणी मुंबई पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करायचं आहे. परंतु, आतापर्यंत कंगनाला मुंबई पोलिसांकडून समन्स मिळालेले नाही. त्यामुळे कंगना पोलिसांना आपले स्टेटमेंट देऊ शकली नाही. कंगनाच्या डिजिटल टीमने कंगनाची बहीण आणि तिची मॅनेजर रंगोली चंदेलच्या व्हॉट्सॲप चॅटला ट्विटरवर शेअर केले आहे.
कंगनाच्या डिजिटल टीमने या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, कंगनाला आतापर्यंत कुठलाही अधिकृतपणे समन्स मिळालेले नाही. रंगोलीला मागील दोन आठवड्यांपासून अनधिकृत कॉल्स येत आहेत. कंगनाला आपला जबाब नोंदवायचा आहे. परंतु, आम्हाला मुंबई पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. हे ते स्क्रीनशॉट आहेत, जे रंगोलीने मुंबई पोलिसांना पाठवले होते.
Post a Comment