केस गळण्याची समस्या, जाणून घ्या ‘रामबाण’ उपाय



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - वृद्धत्वात कसे पिकणे आणि गळणे सामान्य आहे, परंतु अकाली ही समस्या होणे चिंतेचा विषय आहे. या समस्येची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये संतुलित आहाराचा अभाव, डाएटमध्ये पोषणाची कमतरता, तणाव, केसांची देखभाल योग्यपद्धतीने न करणे, केसांमध्ये केमिकल युक्त शॅम्पू वापरणे.

यासोबतच, ही अनुवंशिक समस्यासुद्धा आहे जी प्रत्येक पिढीमध्ये दिसून येते. सामान्यपणे महिला आणि पुरुष दोघे यामुळे त्रस्त असतात, परंतु पुरूषांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. काही टिप्स वापरून ही समस्या दूर करता येईल.

माईल्ड शॅम्पूने धुवा केस
केस नियमित धुतले पाहिजेत. यामुळे केस गळण्याचे थांबते. यासाठी माईल्ड शॅम्पूचा वापर करा. केमिकलयुक्त शॅम्पू टाळा.

विटामिन-ई आणि बी लाभदायक
विटामिन-ई केसांसाठी लाभदायक असते. यामुळे स्कॅल्पमध्ये सीबमचे उत्पादन होते. याच्या सेवनाने रक्ताभिसरण योग्यप्रमाणात होते. तर व्हिटॅमिन-बी केसांचा रंग कायम राखण्यासाठी उपयोगी आहे.

डाएटमध्ये प्रोटीनचे सेवन करा
आपल्या डाएटमध्ये लीन मीट्सचा समावेश करा. सोबतच सोयाबीन आणि मासे सुद्धा खा. यामुळे केस मजबूत होतात आणि गळती थांबते.

केसांचा मसाज करा
स्कॅल्प मसाजने अकाली केस गळण्याची समस्या दूर होते. यासाठी रोज सकाळी आणि सायंकाळी नारळाच्या तेलाने किंवा बदामाच्या तेलाने मसाज करा.

ओल्या केसातून फणी फिरवू नका
यामुळे केस कमजोर होतात आणि गळू लागतात. यासाठी आंघोळीनंतर केस चांगल्याप्रकारे टॉवले कोरडे करा. त्यानंतरच विंचरून घ्या.

हायड्रेटेड राहा
केस निरोगी राखण्यासाठी रोज तीन ते चार लीटर पाणी प्या. यामुळे पचनशक्ती मजबूत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post