राज्यात 8 हजार 641 नवे करोना रुग्ण, 266 मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 8 हजार 641 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांमध्ये 266 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 3.94 टक्के इतका झाला आहे. दरम्यान मागील 24 तासांमध्ये 5 हजार 527 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 140 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.63 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 14 लाख 46 हजार 386 नमुन्यांपैकी 2 लाख 84 हजार 281 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 10 हजार 394 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 42 हजार 833 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
राज्यात सध्या 1 लाख 14 हजार 648 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत 1 लाख 58 हजार 140 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रमुख शहरांमधल्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या
मुंबई - 24 हजार 307
ठाणे - 34 हजार 821
पुणे- 27 हजार 389
नाशिक 3 हजार 25
कोल्हापूर- 621
औरंगाबाद- 3 हजार 626
Post a Comment