तिरुपती बालाजी मंदिरातील 140 कर्मचारी करोनाग्रस्त




माय अहमदनगर वेब टीम
तिरुमला - जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या प्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या पुजारी आणि कर्मचार्‍यांसह 140 जणांना करोनाची लागण झाली आहे. यानंतरही देवस्थानम् मंडळाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी मात्र, मंदिरात सार्वजनिक दर्शन रोखण्याची कोणतीही योजना नसल्याचे म्हटले आहे.

चाचणी दरम्यान बालाजी मंदिरात कार्यरत असणारे 140 कर्मचारी करोनाबाधित असल्याचे आढळले असून यात 14 पुजार्‍यांचा समावेश आहे. दररोज या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. त्यामुळे, इथून करोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

अधिकार्‍यांनीही भौतिक दुरतेची गरजे असल्याचा पुनरुच्चार केला आहे. परंतु, मंडळाचे अध्यक्ष सुब्बारेड्डी यांनी करोना संक्रमित आढळलेल्या लोकांपैंकी 70 हून अधिक जणांनी यावर मात केल्याचे सांगितले.

त्यांच्या म्हणण्यानुसार बाधित आढळलेल्या लोकांपैंकी अनेक जण आंध्र पोलिस कर्मचारी आहेत जे मंदिरासोबतही काम करत आहेत. यातील केवळ एका रुग्णामध्ये गंभीर लक्षण आढळले आहेत. तिरुमला मंदिर बंद करण्याची आमची कोणतीही योजना नाही. परंतु, काळजी म्हणून ज्येष्ठ पुजार्‍यांना कामावर ठेवले जाणार नाही. सोबतच पुजारी आणि कर्मचार्‍यांनी वेगवेगळ्या निवासाची मागणी केली असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post