भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी - पंतप्रधान



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. भारत तुम्हाला आपल्या शेतकर्‍यांच्या मेहनतीत, तसेच आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करत आहे. भारत सध्या स्वत:ला गॅस बेस्ड अर्थव्यवस्थेत बदलत आहे. एव्हिएशन, ऊर्जा क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. United States to invest in various sectors of the Indian economy क्लीन एनर्जीच्या क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी संधी उपलब्ध आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. Prime Minister Narendra Modi ते अमेरिका भारत बिझिनेस कौन्सिलच्या इंडिया आयडिया समिटमध्ये बोलत होते. India-Ideas Summit

ते म्हणाले, आत्मनिर्भर भारत योजनेच्या Aatma Nirbhar Bharat माध्यमातून आम्ही समृद्ध भारत आणि जगासाठी योगदान देत आहोत. त्यासाठी आम्ही तुमच्या भागीदारीची प्रतीक्षा करत आहोत, आपल्याला देशांतर्गत उत्पादनाची क्षमता वाढवण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त आर्थिक संस्थांनाही बळकट करण्याची गरज आहे. आज संपूर्ण जग हे भारताकडे पाहत आहे. भारतात संधी आणि तंत्रणाचा ताळमेळ आहे, गेल्या सहा वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था अधिक मुक्त करण्यासाठी तसंच अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

भारतानं विमा क्षेत्रात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. insurance sector तसंच संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीचं कॅप वाढवून ते 74 टक्के करण्यात आलं आहे. defence sector तसंच आम्ही अंतराळ संशोधन क्षेत्रातही मोठ्या सुधारणा करत आहोत. या क्षेत्रातही गुतवणुकीचं स्वागत केलं जाणार असल्याचही मोदींनी स्पष्ट केलं.

भारत आणि अमेरिकेनं मैत्रीची एक नवी उंची गाठली आहे. आता आमची भागीदारी जगला या महामारीतून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

भारताचे मोठे सहकार्य - केनेथ जस्टर

भारतानं जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांना औषधं उपलब्ध करून दिली आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य उत्तम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्‍यानंतर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेकदा संभाषण झालं आहे. आम्ही खरोखरच एका सामरिक भागीदारीचे सर्वसमावेशक जागतिक रणनीतिक भागीदारीत रूपांतर केले आहे आणि पंतप्रधानांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे हे दोन्ही देशांमधील 21 व्या शतकातील हे सर्वात महत्त्वपूर्ण संबंध असू शकतात, असं मत अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी व्यक्त केले.

भारत संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख भागीदार - पॉम्पिओ

भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील उद्योन्मुख भागीदार आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी केलं. तसंच पुढील जी 7 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचंही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post