जपानी कंपन्या भारतात गुंतवणूकीसाठी उत्सुक
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जपानमधील सहापेक्षा अधिक कंपन्यांनी Japanese companies उत्तरप्रदेशात Uttar Pradesh गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकताkeen to invest दर्शवली आहे. यामध्ये मियाची कॉर्पोरेशन आणि टोकाची कॉर्पोरेशनसारख्या दिग्गज उद्योगांचा देखील समावेश असल्याचे समजते.
गुंतवणूक प्रस्ताव सादर केलेल्या उद्योगांमध्ये पाच मत्स्यपालन उद्योगांनी उत्तरप्रदेशात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले मत्स्यपालन व्यवसाय स्थापन करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच कृषी प्रक्रिया उद्योगातील सिंचनसुविधेसाठी 100 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प देखील स्थापन करण्यास हे उद्योग उत्सुक आहेत.
उत्तरप्रदेशचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात प्रोत्साहन मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांची जपानी उद्योगांसोबत मंगळवारी आभासी स्वरूपात (ऑनलाईन) चर्चा झाली, त्यावेळी हा प्रस्ताव सादर करण्यात आला. या आभासी बैठकीस भारताचे जपानमधील राजदूत संजय वर्मा हे देखील उपस्थित होते.
यावेळी उत्तरप्रदेश सरकारने संभाव्य गुंतवणूकदारांना राज्यातील विविध भागात उपलब्ध असलेल्या एक लाख हेक्टर जमिनीच्या भौगोलिक माहिती प्रणालीचा नकाशा सादर केला. या शिवाय द्रूतगती महामार्गांचे जाळे, हवाई जोडणी देखील राज्यात उपलब्ध असल्याचे सांगितले.
करोना महामारीनंतर चीनमधून बाहेर पडण्यास उत्सुक असलेल्या बहुराष्ट्रीय उद्योगांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या अभियानांतर्गत जपानमधील उद्योगांशी चर्चा करण्यात आली, असे सिंह यांनी सांगितले.
काही देशांसोबत नियमितपणे चर्चा केली जात आहे. जपानी उद्योगांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान आम्हाला ठोस प्रस्ताव प्राप्त झाला. विविध देशांत निर्यात वाढवण्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने प्रयत्न करीत आहे आणि हे सर्व प्रयत्न सुनियोजित पद्धतीने केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशातील निर्यात जपानमध्ये वाढण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, चीनमधून जपानला दरवर्षी 173 अब्ज डॉलर्सची निर्यात केली जाते. भारताची ही निर्यात दरवर्षी 4.8 अब्ज डॉलर्सची आहे, असे त्यांनी सांगितले. चीनकडून जपानला केली जाणारी निर्यात भूराजकीय कारणांमुळे सध्या विस्कळीत झाली आहे.
चीनविरोधातील प्रक्षुब्ध भावना आणि कुणालाही या देशासोबत व्यवहार करण्याची इच्छा नसल्याने सध्या पुरवठा श्रृंखला विस्कळीत झाली. भारत या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो. 10 टक्के पुरवठा श्रृंखला विस्कळीत झाली, असा अंदाज लावला, तरी भारताला 17.3 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीची संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment